dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून 

करमाड : शेकटा येथे शेतात काम करत असलेल्या सुंदराबाई नामदेव जाधव, (७५ वर्ष), रा. शेकटा, ता. छत्रपती संभाजीनगर या वृध्द महिलेची दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सुंदराबाई जाधव ह्या शनिवारी शेकटा शिवारातील गट क्रमांक 19 मध्ये असलेल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शेतातून जाणाऱ्या काही नागरिकांना त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असल्याचे आढळून आल्या. तसेच त्यांच्या डोक्यवर दगडाने वार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, संतोष टिमकीकर, शाम ढवळे, सुनील लहाने व सोपान डकले आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाकडून तपास करण्यात येत असून संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top