dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विजेच्या धक्क्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू; लोंबकळत्या तारांमुळे भीषण दुर्घटना

मेडशी : वाकळवाडी मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान विजेच्या धक्क्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० फेब्रुवारी रोजी घडली. अकोला–नांदेड रोडवरील वाकळवाडी बायपासखाली रस्त्याच्या डाव्या बाजूच्या शेतात  महावितरणच्या हायव्होल्टेज तारा अत्यंत धोकादायकरीत्या लोंबकळत होत्या. याच जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ट्रॅक्टर चालक गजानन नथुजी बोरकर (वय ५०, रा. पांगरी नवघरे) यांचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्याची दुरवस्था झाल्याने काही अंतराचे सिमेंटीकरण युद्धपातळीवर सुरू असून या कामासाठी ट्रॅक्टर टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यात येत होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विजेच्या तारा जमिनीजवळ लटकत असून त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. या तारांमधून मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह सुरू असल्याने संपर्कात येताच चालकाचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांप्रकरणी महावितरणने तातडीने कारवाई करून त्या सुरक्षित उंचीवर हलवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन व वीज वितरण कंपनीने वेळीच पावले उचलली नाहीत, तर भविष्यात अशाच प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top