पिंपळगाव रेणुकाई : शेतात रोटाव्हेटर मारत असतांना मित्र आणि शेजारी त्याठिकाणी आल्याने ट्रक्टरमालक संदीप गुंड हे गप्पा मारण्यासाठी खाली उतरले, गप्पा सुरू असतांना एका मित्राचे अचानक लक्ष ट्रक्टरच्या सीटजवळ डोकावत असलेल्या सापाकडे गेले. एका तासापासून घोणस नावाचा विषारी साप त्यांच्या अवतीभोवती होता. मित्र आले नसते, तर कदाचित काळाने डाव साधला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

भोकरदन तालुक्यातील नानगाव येथील तरुण शेतकरी संदीप बाळासाहेब गुंड हे स्वतःच्या ट्रॅक्टरवर दुपारी शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचे मित्र सतीश कांबळे आणि शेजारी उद्धव गुंड हे त्याठिकाणी आले होते. या दोघांसोबत गप्पा मारण्याच्या निमित्ताने संदीप गुंड हे ट्रॅक्टरवरून खाली उतरले. त्यावेळी मित्र कांबळे यांचे लक्ष जवळच असलेल्या ट्रॅक्टरवरील सीटच्या मागे डोकावत असलेल्या अती विषारी घोणस सापाकडे गेले. हा प्रकार पाहून तिघांचाही काहीवेळ थरकाप उडाला. मित्र आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा संदीप गुंड यांच्यावर काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी म्हणण्याची वेळ आली. हा अती विषारी पूर्ण वाढ झालेला अंदाजे तीन फूट लांबीचा साप ट्रॅक्टरच्या सीटखाली अडगळीला बसलेला होता. सीटच्या स्प्रिंग मध्ये अडकल्यामुळे त्याला हालचाल करता आली नाही. ट्रॅक्टरवर बसण्यापूर्वी त्याठिकाणी असलेला साप गुंड यांना दिसला नाही. तासभर त्यांनी रोटव्हेटरने शेताची मशागत केली. परंतु सुदैवाने जीवावर बेतणारा प्रसंग टळला. आजपर्यंत केलेले पुण्य, सामाजिक कार्य यामुळे मला परमेश्वराने या संकटातून वाचवले. विशेष म्हणजे माझा मित्र सतीश कांबळे हे वेळेत आले नसते, तर कदाचित मी ट्रॅक्टरवर काम चालूच ठेवले असते.