छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य.| काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (वय ५१, रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढा काॅलनी, सदाशिव पेठ) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करुन आक्षेपार्ह वक्तव्य केले. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना केली. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. सपकाळ यांचे वक्तव्य तेढ निर्माण करणारे आहे, असे घाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

घाटे यांनी शनिवारी सायंकाळी याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जावरुन पोलिसांनी रात्री उशीरा पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे तपास करत आहेत. दरम्यान, सपकाळ यांनी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले. पुण्यात पतित पावन संघटनेकडून काँग्रेस भवनसमोर रविवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »