भोकरदनमध्ये शॉर्टसर्किटमुळे होलसेल दुकान जळाले | १२ ते १३ लाखांचे नुकसान; व्यापाऱ्याची मदतीची अपेक्षा

भोकरदन  :  भोकरदन शहरातील सिल्लोड रोडवरील कैलास कॉम्प्लेक्समधील ‘ओम साई स्टोअर्स’ या गोळ्या-बिस्किटांच्या होलसेल दुकानाला शुक्रवार, 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भीषण आग लागून अंदाजे १२ ते १३ लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास शहरात वीजपुरवठा खंडित होणे व सुरू होणे असे प्रकार सुरू होते. त्याच दरम्यान दुकानातून धूर निघताना दिसल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. काही क्षणातच आगीने तीव्र रूप धारण केले. दुकानात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पॅकिंगमधील चॉकलेट्स, बिस्किटे, चिप्स तसेच किराणा साहित्य साठवलेले असल्याने आग झपाट्याने पसरली.

या घटनेत विविध कंपन्यांचा माल, मसाले व किराणा साहित्य जळून खाक झाले. तसेच दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे, फर्निचर व काउंटरचेही नुकसान झाले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळाले होते.

दुकानमालक निखिल ढोके यांनी मोठा माल साठवलेला असताना ही घटना घडल्याचे सांगितले. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »