dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

परभणीच्या महापौरपदी सय्यद इक्बाल काजी विराजमान; उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची वर्णी

परभणी :  शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इक्बाल सय्यद काजी यांची परभणीच्या महापौरपदी गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी बहुमताने निवड करण्यात आली. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश सुरेश देशमुख यांची निवड करण्यात आली. सय्यद इकबाल यांना 37 मते मिळाली तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतांवर समाधान मानावे लागले.

परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी मनपाच्या बी. रघुनाथ सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज बघितले. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इक्बाल सय्यद काजी व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इक्बाल सय्यद काजी यांना 37 मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मते मिळाली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गणेश देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाझेमा बेगम यांच्यात लढत झाली. त्यात गणेश देशमुख यांना 38 मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवाराला 27 मतांवर समाधान मानावे लागले. परभणीच्या महापौर आणि उपमहापौरपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याची आतषबाजी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top