अनोळखी मृत्यूचा उलगडा; मोटारसायकलच्या वादातून खून: नाल्याजवळ सापडलेल्या प्रेतप्रकरणाचा शिरपूर पोलिसांकडून काही तासांत छडा 

शिरपूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी इसमाच्या खुनाचा थरारक प्रकार उघडकीस येऊन काही तासांतच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे.

शिरपूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी इसमाच्या खुनाचा थरारक प्रकार उघडकीस येऊन काही तासांतच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे.

  १० फेब्रुवारी रोजी किन्हीघोडमोड फाट्याजवळील अडोळ नाल्याच्या काठावर सुमारे ३५ वर्षीय पुरुषाचे रक्तबंबाळ अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. शरीरावर गंभीर जखमा असल्याने प्रथमदर्शनी हा खून असल्याचे स्पष्ट झाले. मृताची ओळख न पटल्याने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे शवगृहात ठेवण्यात आला होता. दरम्यान, सोनल उर्फ साक्षी राजू खरात (रा. दापुरी खुर्द, ह.मु. हडपसर, पुणे) यांनी आपले पती राजू कैलास खरात (वय ३५) हे रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. रुग्णालयात नेल्यानंतर त्यांनी मृत इसमाची ओळख आपले पती म्हणून पटवली.  तक्रारीनुसार, मोटारसायकलच्या वादातून सुनील बबन शिंदे, त्याचा मित्र गणेश सखाराम सुरशे व आणखी एकाने संगनमत करून राजू खरात यांना मारहाण करून ठार मारल्याचे निष्पन्न झाले. यावरून शिरपूर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड व सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने काही तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक केशव वाघ, उपनिरीक्षक इम्रान पठाण व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »