dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

’स्किल बेस्ड’ ज्ञानासाठी मोठया रोजगार संधी : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी | विद्यापीठातील ’मेगा जॉब फेअर’ ला पदवीधारकांचा प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर :  शासकीय नोकऱ्‍यांपेक्षाही खासगी कंपन्या मध्ये नोकरीच्या संधी मोठया प्रमाणावर आहेत. त्यातही ’स्किल बेस्ड’ पदविका, पदवीधरकांनी आपल्या क्षमतेच्या संपुर्ण वापर करुन रोजगार मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. तसेच राज्य व केंद्राशासनाच्यावतीने रोजगार, स्वयंरोजगार संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ’मेगा जॉब फेअर’चे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते बुधवार, 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. मेळाव्यास पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवीधारक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी. आय. आय. तसेच मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी महोत्सव घेण्यात आला.  कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उपायुक्त विद्या शितोळे, सहाय्यक आयुक्त राजु वाकुडे, रोजगार व उद्योजकता अधिकारी बहुरे, मॅन युनाटेड कॉर्पोरेटचे रवींद्र कांगराळकर, विद्यापीठाचे प्लेसमेंट ऑफीसर डॉ.गिरीश काळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी जॉब फेअरमध्ये सहभागी कंपन्यांचे एच आर, मॅनेजर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top