dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रगट दिनानिमित्त श्रींचे मंदिर दोन दिवस दर्शनासाठी 24 तास खुले! गण गण गणात बोतेच्या गजरात संत नगरीत भक्तांची मांदियाळी 

शेगाव :  श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे प्रगट दिनानिमित्त सात फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले राहणार असल्याची माहिती श्री संस्थांकडून देण्यात आली आहे.

अनुप गवळी |  शेगाव :  शेगावीच्या राणाला डोळे भरून पाहतो । आम्ही गजाननामया भजनात नहातो ।। या ओवी प्रमाणे विदर्भाचे पंढरीनाथ म्हणून ओळख असलेल्या शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांच्या 148 व्या प्रकट दिनानिमित्त लाखो भाविक संतनगरी शेगाव मध्ये श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करतांना दिसून येत आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे प्रगट दिनानिमित्त सात फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले राहणार असल्याची माहिती श्री संस्थांकडून देण्यात आली आहे.

          श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे श्रींचा 148 व प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून गजानन महाराज मंदिरामध्ये 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पावेतो धार्मिक परंपरेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 2 फेब्रुवारी रोजी मंदिरात श्री महारुद्रस्वाहाकार यागाचे पूजन करून श्रींच्या प्रगट दिन उत्सवाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर दररोज विविध क्षेत्रातून आलेल्या हरिभक्त परायण यांच्या माध्यमातून कीर्तने सुरू असून आठ फेब्रुवारी रोजी श्रींचा 148 वा प्रगट दिन उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त संतनगरी शेगाव मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जवळपास 650 भजनी दिंड्या दाखल झाल्याची माहिती श्री संस्थान करून देण्यात आली असून भजनी दिंड्यांची संख्या आणखी वाढणार असल्याचेही बोलल्या जात आहे. शेगाव मध्ये दाखल होणाऱ्या भजनी दिंड्यांचे ठिकठिकाणी श्री भक्तांकडून स्वागत केले जात असून प्रगट दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात महाप्रसादांचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी संस्थांना तर्फे श्रींची समाधी दर्शन व्यवस्था, श्रीमुख दर्शन व्यवस्था, श्री महाप्रसाद, श्री पारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी श्री संस्थांना तर्फे 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी ही दोन दिवस श्रींच्या दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले राहणार असल्याचे संस्थांतर्फे सांगण्यात आले.

 दर्शनासाठी दीड किमी ची लाईन 

 संत नगरी शेगाव मध्ये श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रगट दिनानिमित्त दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून आनंद सागर विसावा जवळील स्कायवॉक येथून भक्तांची रांग शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. भक्तांच्या सेवेसाठी मंदिरातर्फे ठीक ठिकाणी सेवेकरांची नियुक्ती करण्यात आली असून सेवेकऱ्यांकडून भक्तांना उत्तम सेवा प्रदान केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top