dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेतकरी कर्जमाफी योजनेत बारा भानगडी..!

आ. अनुराधा चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

तांत्रिक अडचणींमुळे पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक समस्येवर स्पष्ट व स्वयं-स्पष्ट कार्यपद्धती निर्गमित करून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार अनुराधा चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

छत्रपती संभाजीनगर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार अनुराधा चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत समस्यांबाबत निवेदन सादर केले.

कर्जमाफीसाठी दि. १ एप्रिल २०१९ पासून तयार करण्यात आलेल्या यादीतील काही शेतकऱ्यांनी कर्ज वाटपानंतर शेतीची विक्री केली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या नावावर शेती नसल्याने फार्मर आयडी तयार होत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. तसेच कर्जमाफी यादीतील काही लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या वारसदारांच्या नावावर शेती नसल्याने केवायसी आणि फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया रखडली आहे.

याशिवाय, सणाच्या पोर्टलवर दर्शविण्यात आलेली कर्जमाफीची रक्कम आणि संबंधित बँकांच्या नोंदीतील रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध असूनही ई-केवायसी करताना ‘Not Found’ असा संदेश येत असल्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोर्टलवरील लाभार्थी यादीमध्ये काही शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक चुकीचे नमूद असल्याचेही निदर्शनास आले आहे.

तांत्रिक अडचणींमुळे पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक समस्येवर स्पष्ट व स्वयं-स्पष्ट कार्यपद्धती निर्गमित करून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार अनुराधा चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top