dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मराठा कार्यकर्त्यांची धरपकड..!

धर्मवीर छावा संघटनेचे गणेश उगले पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शहरात दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने खबरदारी म्हणून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी संबंधित धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले यांना  त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.

भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर उगले यांच्याकडे पोलिसांचे लक्ष होते. लाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तिरंगा रॅलीसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चासह विविध मराठा संघटनांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री शहरात येत असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे मराठा संघटनांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजपाची संबंधित वादग्रस्त आमदार किंवा सरकारमधील मंत्री येताच मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे प्रकार वाढले आहेत. हा प्रकार पोलीस प्रशासनाने बंद करावा अशीही मागणी समोर येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, गणेश उगले यांना नेमक्या कोणत्या कारणास्तव आणि किती कालावधीसाठी ताब्यात ठेवण्यात आले आहे, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि आंदोलकांमध्ये कोणती भूमिका किंवा संवाद होतो, याकडेही आता लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top