गंगापूर : वीज अंगावर पडून एका 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 5 मे रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील कोंडापूर शिवारात घडली. अशोक नंदू म्हस्के (२१ वर्ष), रा. कोंडापूर, ता. गंगापूर असे मयत युवकाचे नाव आहे.

अशोक म्हस्के हे कोंडापूर शिवारातील गट क्रमांक 89 मध्ये कुटुंबासह शेतवस्तीवर वास्तव्यास होते. सोमवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास अचानकपणे मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा सुटला होता, तसेच पावसाचे थेंबही पडण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी अशोक म्हस्के हे घरात प्रवेश कीरत असतांना ओट्यावरच त्यांच्या अंगावर वीज कोसळली. विजेचा जोर एवढा होता की, त्यांच्या डोक्यावरी केस व अंगावरील कपडे जळाले आणि जागेवरच बेशुध्द होवून पडले होते. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अशोक म्हस्के यांना उपचारासाठी गंगापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सुर्यवंशी यांनी तपासून अशोक म्हस्के यांना मयत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस अंमलदार विजय पाखरे करीत आहेत. या घटनेमुळे कोंडापूर गावावर शोककळा पसरली आहे.