छत्रपती संभाजीनगर : बेदम मारहाण करीत तरुणाचा आमनुषपणे खून करण्यात आल्याची घटना एमआयडीसी वाळूज परिसरातील आंबेलोहळ परिसरात शनिवार, 12 जुलै रोजी उघडकीस आली. अर्जून रतन प्रधान (23 वर्ष), रा. कमळापूर रोड, वाळूज असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अर्जून प्रधान हा एमआयडीसी वाळूज परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तसेच त्याचा 11 जुलै रोजी पगार झाला होता. शनिवारी सकाळी मयत अर्जून प्रधान याचा सावत्र भाऊ रामकृष्ण रतन प्रधान याला अर्जून आंबेलोहोळ येथे रस्त्याच्या कडेला अर्धनग्न अवस्थेत बेशुध्दावस्थेत पडून असल्याचा निदर्शनास आला. या घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, नरेश ठाकरे, उपनिरीक्षक आत्माराम बोराडे, किशोर साबळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा करीत बेशुध्दावस्थेत पडून असलेल्या अर्जून प्रधान याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असता श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.