वाशिम : महायुती सरकारने महिलांसाठी राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मिळालेल्या उत्सादात कोणताही खंड पडणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर ही योजना बंद होणार, असा अपप्रचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरूच आहे. मी मुख्यमंत्री असेपर्यंत ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही,’ असा ठाम शब्द फडणवीस यांनी सभेत दिला.

वाशिममध्ये शुक्रवारी आयोजित सभेत बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, ‘लाडक्या बहिणी फक्त लाडक्या राहणार नाहीत, तर त्या लखपती दिदी बनतील, यासाठी राज्य सरकारने व्यापक उपक्रम सुरू केले आहेत. राज्यात आतापर्यंत ५० लाख महिला लखपती दिदी बनल्या असून येत्या काळात आणखी ५० लाख महिलांना या उपक्रमाचा लाभ देण्यात येणार आहे.’ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेने महिलांसाठीच्या योजना कायम राहणार आणि आणखी विस्तारल्या जाणार असल्याचा स्पष्ट संदेश मिळाला. या सभेला खासदार अनुप धोत्रे, माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार बाबूसिंग महाराज, आमदार श्याम खोडे, सईताई डहाके, अमित गोरखे, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरु, विजयराव जाधव, लखन मलिक, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, राजू पाटील राजे, मनिष मंत्री आदींची उपस्थिती होती. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी केले.