dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रॅली उत्साहात

अजिंठा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील श्री. रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा तसेच श्री. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धावडा यांच्या संयुक्त विद्यमाने धावडा येथे शाळेतील मुलांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन गावातून तिरंगा रॅली गुरुवार, 14 ऑगस्ट रोजी काढली होती. 

धावडा येथे काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यविर, सैनिक, पोलिस, शेतकरी, वारकरी यांची वेशभूषा केली होती. यावेळी ढोल पथक, लेझीम पथकाच्या गजरात विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान, जय किसान अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या. रॅलीचा समारोप सामूहिक पसायदानाने करण्यात आला. आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत हर घर तिरंगा अभियानात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कौतिक खडके, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील डोंगरे, प्राचार्य किरण सपकाळ, दत्ता ढाकणे, मधुकर निकाळजे, देविदास काकडे, गजानन कड, बाळकृष्ण तबडे, नवनाथ इंगळे, राहुल पवार, महादेव तरमुडे, इम्रान पठाण, भानुदास खडके, मनीष बोडखे, गजानन तबडे, प्रदीप सीरसाट, सुरज पटेल, चेतन चव्हाण, हादी पठाण, विशाल खोडे, विशाल पवार, संतोष गाडेकर, गजानन तबडे, विशाल भागवत, मंगला पालकर, कुशिवर्ता काकडे, संगीता लांडगे, पूजा तबडे, अश्विनी बोराडे, रुखमन बोराडे, रतन बोरसे, वैभव काळे, मंगेश आल्हाट, पवन लेनेकर यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top