वृद्ध महिलेवर रानडुकराचा प्राणघातक हल्ला

Wild boar attacks elderly woman

Wild boar attacks elderly woman : रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा येथील रहिवाशी वंदनाबाई भास्करराव सरनाईक (वय 65) या आपल्या शेतात तुरीच्या शेंगा वेचत असताना त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा पाय फॅक्चर झाल्याची माहिती आहे.

Wild boar attacks elderly woman

वाशीम : रिसोड तालुक्यातील देऊळगाव बंडा येथील रहिवाशी वंदनाबाई भास्करराव सरनाईक (वय 65) या आपल्या शेतात तुरीच्या शेंगा वेचत असताना त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा पाय फॅक्चर झाल्याची माहिती आहे.
वंदनाबाई नेहमी प्रमाणे आपल्या मालकीच्या शेतात तूर कापणी नंतर शेतात पडलेल्या व खोडाना असलेल्या शेंगाची वेचणी करत होत्या.   याच पिकातून रान डुक्कराने त्यांच्यावर हल्ला केला.  त्यांनी आराडा ओरड केल्याने त्यांचे प्राण वाचले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखम ही गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्हा रुग्णालतून पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »