जालना : पक्ष संघटन हे निवडणुका असो अथवा इतर कोणतेही कार्य असो, अत्यंत महत्वाचे असते. पक्ष संघटन मजबूत असेल तर आपण सर्व निवडणुका अत्यंत चांगल्या प्रकारे जिंकू शकतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी येथे सांगितले.

जालना : पक्ष संघटन हे निवडणुका असो अथवा इतर कोणतेही कार्य असो, अत्यंत महत्वाचे असते. पक्ष संघटन मजबूत असेल तर आपण सर्व निवडणुका अत्यंत चांगल्या प्रकारे जिंकू शकतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी येथे सांगितले.
जालना शहरातील पक्षाच्या पदाधिकार्यांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान दानवे यांनी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनेते लक्ष्मण वडले, उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, माजी सभापती
मुरलीधर थेटे, बाबुराव पवार,तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, घनश्याम खाकीवाले, तुळशीदास काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, 30 मे रोजी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, आगामी निवडणुका आपल्यातीलच अनेक जण उमेदवार असणार आहेत. भावी लोकप्रतिनिधीही आपल्यातील असतील. या करिता प्रत्येकांनी पक्ष संघटनेचे आवडीने काम करावे. येणार्या निवडणुका हे महत्वाचे उद्दष्टि आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येकांनी झटून काम केले पाहिजे, असेही अंबादास दानवे म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, जालना शहरातील दोन्ही बैठकांना उपस्थित पदाधिकारी हे अत्यंत निष्ठावंत व विश्वासू आहेत.
पक्षाच्या अत्यंत कठीण काळात हे सर्व पक्षाच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभे राहिलेले आहेत. शहरातील तिनही शहरप्रमुख अत्यंत चांगल्या प्रकारे काम करीत असून संघटन मजबूत करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या क्षेत्रातील निवडणूक याद्यांचे वाचन करावे, स्थलांतरीत मतदार, मृत मतदार या सर्व बाबी आवर्जून पाहाव्यात. कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी कोणतेही अमिषाला बळी न पडता निष्ठेने पक्षाचे कार्य करावे, असे आवाहन अंबेकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक संदीप झारखंडे, संदीप नाईकवाडे, सखाराम मिसाळ, जे.के. चव्हाण, विजय शेंदरकर, रविकांत जगधने, राजू खर्डेकर, महादेव कावळे, जान महम्मद कुरेशी, निखील धारेगावकर, घनश्याम कुमठे यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.