dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

परभणीच्या विकासासाठी निधी खेचून आणू :  आ. डॉ. राहुल पाटील ; शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार 

परभणी :  नुकतीच झालेली महानगरपालिका निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा स्वरूपाची होती, या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाला व काँग्रेसला जनमताचा कैल मिळाला असून शहराच्या विकासासाठी आम्ही निधी खेचून आणू, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले. शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे, शिवसेना महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला जिल्हा प्रमुख अंबिका डहाळे, काँग्रेसचे माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजी उपमहापौर माजुलाला, सय्यद कादर, मुजाहीद खान, रविराज देशमुख, नदीम इनामदार, सूर्यकांत हाके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, विशु डहाळे, बाळराजे तळेकर आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top