dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आम्ही कार्यकर्ते बाळासाहेबांचे खरे वारसदार: एकनाथ शिंदेंचा अकोल्यात घाणाघात 

अकोला : जे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवतात त्यांचा जीव मुंबई महापालिकेच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप करत आम्ही कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहोत, असा घाणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला.  

अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी नाव न घेता  ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन बरोबर करतो, करेक्ट कार्यक्रम करतो. हे जनतेने २०२२ मध्ये बघितले आहे, आणि याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शाबासकी दिली असती, असेही ते यावेळी म्हणाले. काही लोक स्वतःला मालक समजतात, कार्यकर्त्याला गुलाम समजतात, अशाने पक्ष मोठा होत नाही. कार्यकर्त्यांना जपावे लागते, त्यांना मोठं करावे लागते. मी कार्यकर्ता म्हणून काम करणारा आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता राहणार असून हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. 

जो काम करेगा वही राजा बनेगा… 

हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे वारसाने नेता घडत नाही. इथे जो काम करेगा वही राजा बनेगा… असा खोचक टोला त्यांनी लागावला. काही लोकं म्हणायचे शिवसेना ठाण्यापर्यंत मर्यादीत आहे. पण, आज आमची व्याप्ती राज्यभरात पसरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत. म्हणून रोज लोंढेच्या लोंढे लोक बाळासाहेबांच्या विचारांच्या प्रवाहात सामील होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top