अंबड : तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे गल्हाटी नदीला सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने पूर आला. या पुराचे पाणी नदी शेजारी राहणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांच्या घरात शिरले. बबन टाकसाळ, नारायण कांबळे, लक्ष्मण तुपे, वाल्मीक सांगळे, दिगंबर भारती आदी शेतकऱ्यांचे घरगुती साहित्य, धान्य, कपडे व घरातील सामान वाहून गेले. तसेच बोद्ध विहारातही पाणी शिरले असल्याने मोठे नुकसान झाले आहे.

नदीकाठच्या शेतकऱ्यांना या पुराचा तडाखा बसला असून शेतातील ऊस, कापूस, तूर, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेल्याने या अस्मानी संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून ग्राम महसूल अधिकारी शिंदे, ग्रामसेवक जे. डी.चव्हाण यांनी तात्काळ गावात जाऊन पाहणी करून पंचनामे केले आहे.
गावकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई देण्यासह ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किशोर भगवान तुपे, सरपंच कृष्णा आटोळे, उपसरपंच पांडुरंग उढाण, ग्रामपंचायत सदस्य प्रेमानंद उढाण, लखन तुपे, भास्कर खरात, भागवत उढाण, स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष उमेश पाष्टे आदी गावकऱ्याने प्रशासनाकडे केली आहे.