dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मतदान आज मात्र गुलाल २१ डिसेंबरलाच उधळणार: उद्या होणारे मतमोजणी नागपूर खंडपीठाच्या आदेशाने लांबणीवर, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हीरमोड  

नागपूर : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या  निवडणुकीच्या मतदानाच्या दिनी नवा ट्विस्ट आला असून होऊ घातलेल्या राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे असेही न्यायालयाने स्पष्ट केले. निकाल लांबल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

           दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. आज राज्यात नगरपरिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होते. पण, आता या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहेत. निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. निकाल पुढे ढकलण्याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबत कोर्टाने आज २ डिसेंबर रोजी  निकाल दिला आहे. दोन दिवसापूर्वी राज्यातील साधारण २० जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यामध्ये, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top