dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान सुरू

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सहाही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान सुरू असून खुलताबाद येथील मतदान केंद्रावर मतदान मशीन तांत्रिक कारणामुळे बंद झाल्याने जवळपास अर्धा तास मतदानाची प्रक्रिया खोळंबली होती. 

जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, गंगापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड तालुक्यातील नगरपरिषदांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर जवळपास 22 टक्के मतदान झाले असल्याचे समजते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top