पशुवैद्यकीय डॉक्टरने अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटविले;  प्रकृती गंभीर, निमगाव फाट्यावरील घटना 

नांदुरा : जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एका 68 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टराने अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी 9 जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सदर डॉक्टरांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले.

         जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉ. चंद्रकांत विश्वासराव अवचार पाटील (68) रा. जळगाव जामोद यांनी नऊ जुलै रोजी सकाळी निमगाव फाट्याजवळ अचानक अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटविले. या घटनेत डॉ. चंद्रकांत पाटील जवळपास 90 ते 95 टक्के जळाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ओम साई फाउंडेशन च्या रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केले. यावेळी ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा वसोकार, नांदुरा प्रेस क्लब अध्यक्ष विवेक पाऊलझगडे, विनोदबाप्पू देशमुख, सोपान धोटे, गजानन धोटे, पिंपळगाव काळे सरपंच चौखंडे यांनी तातडीने मदत कार्य करत जखमी विश्वासराव पाटील यांना तातडीने उपचार अर्थ प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याबाबत मात्र समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »