छत्रपती संभाजीनगर : जागतिक मानसिक आरोगय सप्ताहानिमित्त 22 ते ते 25 सप्टेंबर या काळात पडेगाव परिसरातील कादरी मानसिक आरोग्य केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. अजीज अहमद कादरी यांनी सोमवार, 22 सप्टेंबर रोजी दिली.

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त कादरी मानसिक आरोग्य केंद्रात सोमवार, 22 सप्टेंबर रोजी वादविवाद स्पर्धा, मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी पोस्ट बनविण्याची स्पर्धा, बुधवार, 24 सप्टेंबर रोजी नाटक, लघुनाट्य स्पर्धा, गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, समाज: मानसिक आरोग्याकडे एकत्रितपणे वाटचाल हे यावर्षीचे घोषवाक्य असून या उपक्रमाचा उद्देश म्हणजे सामूहिक कृती, सहानुभूती आणि समावेशकता याच्या माध्यमातून चांगल्या मानसिक आरोग्याकडे वाटचाल करणे असल्याचे डॉ. अजीज अहमद कादरी यांनी सांगितले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धामध्ये विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याचे डॉ. अजीज अहमद कादरी यांनी सांगितले.