मालमत्ता कर थकविणारे तीन दुकानांना वैजापूर; नगरपालिकेने ठोकले कुलूप 

वैजापूर : मार्चची सुरुवात होताच वैजापूर नगरपालिकेने थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवार, 2 मार्च रोजी जप्ती मोहिमेला सुरुवात केली. पहिल्याच टप्प्यात कै. बाळासाहेब व्यापारी संकुलातील तीन गाळे सील केले. एका गाळेधारकाकडून ४ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली. 

वैजापूर : मार्चची सुरुवात होताच वैजापूर नगरपालिकेने थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवार, 2 मार्च रोजी जप्ती मोहिमेला सुरुवात केली. पहिल्याच टप्प्यात कै. बाळासाहेब व्यापारी संकुलातील तीन गाळे सील केले. एका गाळेधारकाकडून ४ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली. वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न देणाऱ्यांवर थेट कारवाई सुरू केल्याने शहरात खळबळ उडाली.

पालिकेने मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळे भाडे थकबाकीदारांवर कारवाई हाती घेतली. मुख्याधिकारी बी. यू. बिघोत यांच्या निर्देशानुसार तीन गाळे सील करून पालिकेच्या ताब्यात घेतले. पाणीपट्टी न भरलेल्या घरांचे नळ कनेक्शन बंद केले. शहरातील विविध भागांत टप्प्याटप्याने कारवाई सुरू आहे. थकबाकी त्वरित भरावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रभागनिहाय थकबाकीदारांची यादी तयार केली. गाळे सील करणे, थकीत देयकांवर कठोर कारवाई करणे ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. कारवाई टाळायची असल्यास तत्काळ थकबाकी भरावी. अन्यथा मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. ^ वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने आम्हाला जप्तीची कारवाई करावी लागत आहे. संबंधितांनी स्वयंस्फूर्तीने थकबाकी भरून कारवाई टाळवी असे आवाहन वैजापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी बी. यु. बिघोत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »