चिखली: येथील शिक्षक भारती संघटनेच्या बैठकीत श्रीमती उर्मिला साहेबराव शेळके यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. शिक्षक भारतीचे शिक्षक भारतीचे राज्य संघटक सुरेश देवकर यांच्याहस्ते 3 एप्रिल रोजी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षिका उर्मिला शेळके यांची शिक्षक भारतीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हक्काचे दालन उपलब्ध झाले असल्याचे यावेळी राज्य संघटक सुरेश देवकर यांनी सांगितले.उर्मिला शेळके यांची जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणून निवड झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी विष्णू वायाळ, शारदा वायाळ, दै. महाभूमिचे व्यवस्थापक प्रा.राजू वैद्य, सुशिल पनाड, संजय बावस्कर व अदिती अर्बनचे व्यवस्थापक राजेश कोल्हे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.