छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे शुक्रवारी, १८ एप्रिल रोजी चिकलठाणा विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले.

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे शुक्रवारी, १८ एप्रिल रोजी चिकलठाणा विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, खा. डॉ. भागवत कराड,खा. संदीपान भुमरे,आ. प्रशांत बंब,आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे,आ. संजय केणेकर तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते.