Uddhav Thackeray’s public meeting in Buldhana: ते महाराष्ट्र द्रोही आहेत; बुलढाण्यात उध्दव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray's public meeting in Buldhana

Uddhav Thackeray’s public meeting in Buldhana: महायुती सरकार हे महाराष्ट्र लुटणारं सरकार आहे. ते महाराष्ट्र द्रोही आहेत, सरकारने महाराष्ट्राला गुजरतला वाहूनं टाकलं आहे. महाराष्ट्रातील उद्योग, मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray's public meeting in Buldhana

बुलढाणा : महायुती सरकार हे महाराष्ट्र लुटणारं सरकार आहे. ते महाराष्ट्र द्रोही आहेत, सरकारने महाराष्ट्राला गुजरतला वाहूनं टाकलं आहे. महाराष्ट्रातील उद्योग, मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर स्वावलंबी आणि सर्वोत्तम महाराष्ट्र करण्याचे वचनही उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिले.
ते बुलढाणा येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी बोलत होते. बहीण फक्त निवडणुकीपुरतीच लाडकी असते का? असा प्रश्न उपस्थित करून उध्दव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. या महागाईच्या काळात 1500 रुपयात काय होते? आपल्या मुलालाही आपण येवढ्या पैशात शिकवू शकत नाही. परंतू महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देण्यात येईल. दाळ, तांदुळ, गहू, साखर, तेल या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करणार असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.

भाजपला केवळ मतांसाठी छत्रपती हवेत

शिवराय म्हटले की देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाची आग होते. भाजपला केवळ मतांसाठी छत्रपती हवेत, असा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला. भ्रष्ट सरकारने घाई-घाईने शिवरायांचा पोकळ पुतळा उभारला. त्यांच्या अशुभ हाताने पुतळ्याचे लोकार्पण झाले आणि काही दिवसात पुतळा कोसळला. त्यांना शिवरायांचे मंदिर बांधायला अवघड वाटते. परंतू आपले सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधण्यात येईल. ते केवळ मंदिर नसून संस्थापीठ आहे, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.

त्यांनी पक्षावर दरोडा घातला

मागील निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन चांगली संधी दिली होती. मात्र त्या गद्दारांनी संधीची माती केली. त्यांनी आपल्या पक्षावर दरोडा घातला. पक्ष चोरीला गेला. आज प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात गद्दार उभा आहे. परंतू 50 खोके आता नॉट ओके होईल असे म्हणून ठाकरे यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »