बुलढाणा : शहर पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरी प्रकरणातील अट्टल चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी 20 एप्रिल रोजी अटक केली आहे. तेजस संजय पोकळे (रा. रोहिणखेड, ता.मोताळा) असे आरोपीचे नाव असून त्याने दुचाकी चोरीच्या पाच गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरी केलेल्या दुचाकीसह एकूण एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अलीकडच्या काळात शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 15 एप्रिल रोजी शहर पोलिसांत दाखल असलेल्या दुचाकी चोरी प्रकरणाच्या अनुषंगाने तपास केला असता, तांत्रिक बाबी आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न झाला. आरोपी तेजस पोकळे याने अनेक ठिकाणाहून दुचाकी केल्याचे सांगत पाच गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. यावरून, त्याच्याविरोधात बुलढाणा पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, तब्बल एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
‘अशी’ केली चोरी
शहरातील आठवडी बाजार, गॅरेज लाईन व इतर वर्दळीच्या ठिकाणी हँडल लॉक नसलेल्या दुचाकी चोरी करित त्यांची चाके व शॉकप आरोपी काढून घेत असे, असे तपासातून समोर आले आहे. यासंदर्भात स्वतः आरोपीने पोलिसांना कबुली दिली.
कारवाई पथक..
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील शहर ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रताप भोस, भरत चापईतकर, जायसिंग राजपूत, दिनेश मोरे, पोउपनि रवी मोरे, अश्विनी गाडे, माधुरी साळुंके, सपोउपनि नामदेव खवले, पोहेकॉ प्रकाश बाजड, संदीप कायंदे, पंजाबराव साखरे, सुनील जाधव, पोकॉ मनोज सोनूने, योगेश लोखंडे, युवराज शिंदे, कार्तिक बोर्डे, विनोद बोरे, चालक पोहेकॉ रमेश वाघ, चालक पोना विवेक तायडे यांनी केली आहे.