जालना : ट्रॅक्टर ट्रॉली व त्यातील लोखंडी खिडक्यांची चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जालना तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

पृथ्वीराज शिंदे व विशाल गणेश घुले (रा. इंदेवाडी, ता. जि. जालना) असे या चोरीच्या घटनेतील आरोपींची नावे आहेत. गुरुवार, १८ डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी गोकुळधाम परिसरातून एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्यामध्ये असलेल्या लोखंडी खिडक्या लंपास केल्या होत्या. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर ट्रक्टर मालकाने जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणात पोलिसांनी पृथ्वीराज व विशाल या दोन आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी चोरलेला मुद्देमाल परजिल्ह्यात विक्री केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. सध्या बाजारात लोखंडाला चांगला भाव मिळत असल्याने ही चोरी करण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.