वाशिम : मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करून तब्बल चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

वाशिम : मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक करून तब्बल चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला तोडगाव येथील आदर्श जीवन कांबळे हा चोरीच्या मोटारसायकल प्रकरणात सहभागी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने श्रेयस गणेश पाचपिल्ले या साथीदारासह शिरपूर, रिठद (वाशिम जिल्हा) तसेच माळशेलू (हिंगोली जिल्हा) येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीलाही काटा रोड परिसरातून अटक करण्यात आली. दोघांकडून चोरीच्या तीन मोटारसायकली तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल असा एकूण चार वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना शिरपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी चोरीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय अधिकारी नवदीप अगरवाल तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. चोरीच्या घटनांवर प्रभावी कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
