सोयगाव : तालुक्यातील एका गावात 80 वर्षीय वृध्द महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी रमजान शेख (64 वर्ष) व त्याच्या सहकार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बंजारा ब्रिगेडच्या वतीने गुरुवार, 12 मार्च रोजी सोयगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी तहसिलदारामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

सोयगाव तालुक्यातील एका गावात घरात एकट्या असलेल्या 80 वर्षीय वृध्द महिलेवर आरोपी रमजान शेख याने घरात घुसून लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना अटक करण्यात यावी, प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे, याप्रकरणात शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, पीडित महिलेला 20 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येऊन पोलिस संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या तहसिलदरामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.