परभणी : वसमत राष्ट्रीय महामार्गावर कृषी विद्यापीठ गेट काळी कमान ते जागृती मंगल कार्यालय आणि रस्त्याच्या दोन्ही मार्गावर असलेली वाहनांची वर्दळ पाहता भाजी विक्रेत्यांनी संभाव्य अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निश्चित केलेल्या जागेवरच बसावे.

परभणी : वसमत राष्ट्रीय महामार्गावर कृषी विद्यापीठ गेट काळी कमान ते जागृती मंगल कार्यालय आणि रस्त्याच्या दोन्ही मार्गावर असलेली वाहनांची वर्दळ पाहता भाजी विक्रेत्यांनी संभाव्य अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निश्चित केलेल्या जागेवरच बसावे. यासोबतच पादचारी पथ परिसराची जागा ही वाहनांसाठी मोकळी सोडावी अशी सूचना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केली आहे.
परभणी शहरातील काळी कमान परिसरात रविवार, 28 डिसेंबर रोजी दुपारी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या भागातील भाजीपाला विक्रेत्यांसोबत संवाद साधला. तर वेळप्रसंगी कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशाराही त्यांनी दिला. दररोज या मार्गावर शालेय विद्यार्थी तसेच महामार्गावरील विविध ठिकाणाहून येणाऱ्या जड वाहनांची वर्दळ लक्षात घेता सकाळच्या वेळी आणि सायंकाळी येथे नागरिकांची सुद्धा भाजीपाला खरेदीसाठी गर्दी असते मात्र यात रस्त्यावर व्यापार करण्यास विक्रेते बसत असल्याने वाहने उभी करण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे यापुढे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि अपघात होऊ नये याकरिता व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे शिवाय नागरिकांनी पादाचारी पथावर वाहने लावावीत रस्त्यावर वाहने उभे करू नयेत हातगाडे विक्रेते यांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
