जालना शहरात दुष्काळात तेरावा..; पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

जालना : तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असताना पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच जालना शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. अशातच शहरात पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. यामुळे दुष्काळात तेरावा महिना आल्याची गत झाली आहे. 

जालना : तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असताना पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच जालना शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. अशातच शहरात पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. यामुळे दुष्काळात तेरावा महिना आल्याची गत झाली आहे. 

शहरातील निलम टाॅकीजजवळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाई गुरूवारी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी दिसून आले. शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या जालना शहरासह जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत आहे. शहराला आधीच आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. त्यात आता ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. दरम्यान , याबाबत पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.

उन्हाळ्याच्या कडक तापमानात पाण्यासाठी नागरिक त्रस्त असताना जालना शहर  महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील स्टेशन रोडवर निलम टाकीजजवळ पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यांवर वाहत आसल्याचे नागरिकांना पाहायला मिळाले. अनेक तास सुरू असलेल्या या पाण्यामुळे रस्त्यांवर चोहिकडे पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले.

पाण्याचे दुर्भिक्ष्य 

दरवर्षी उन्हाळ्यात जालना शहरात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. शहरात नागरिकांना आठ – दहा दिवसाआड पाणी मिळते. अनेकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागते. जालना शहरात नेहमीच आठवड्याच्या अंतराने पाणी पुरवठा केला जातो. दुसऱ्या किँवा तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येणार, हे दिवास्वप्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »