डावरगाव शिवारात चोरट्यांनी मारला दारूच्या गोडाऊनवर डल्ला; गोडाऊन फोडून सहा लाखाचा माल केला लंपास

अंबड :  शहरापासून जवळच असलेल्या डावरगाव शिवारातील देशी दारूचे गोडाऊन फोडून अज्ञात चोरटयांनी डल्ला मारला. ही घटना 15 ते 16 एप्रिल दरम्यान घडली. चोरट्यांनी गोडाऊनमधील तब्बल सहा लाखांच्या दारूचे बॉक्स लंपास केले. 

अंबड :  शहरापासून जवळच असलेल्या डावरगाव शिवारातील देशी दारूचे गोडाऊन फोडून अज्ञात चोरटयांनी डल्ला मारला. ही घटना 15 ते 16 एप्रिल दरम्यान घडली. चोरट्यांनी गोडाऊनमधील तब्बल सहा लाखांच्या दारूचे बॉक्स लंपास केले. 

 शहारातील जालना – बीड रोडवर बजाज ट्रेंद्रसचे होलसेल देशी दारूचे गोडाऊन  आहे. १५ ते १६ एप्रिलच्या दरम्यान शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ५ हजार दोनशे वीस रुपयाचे बॉक्स लंपास केल्याची घटना घडली.  याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील व्यापारी शिवाजी शामलाल बजाज यांचे अंबड शहरापासून जवळच डावरगाव शिवारात  बजाज ट्रेडर्स या नावाचे देशी दारूचे होलसेल विक्री मालाचे गोडाऊन आहे. 15 ते 16 एप्रिल च्या दरम्यान या दुकानाचे या गोडाऊनचे शटर तोडून आज्ञात चोरट्यांनी देशी दारूचे सहा लाख पाच हजार दोनशे वीस रुपये किमतीचे देशी दारूचे बॉक्स लंपास केले असल्याचे गोडाऊन मधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी व्यवस्थापक व मालक यांना याची माहिती दिली. चोरट्यांनी गोडाऊनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील मोडतोड केली. याप्रकरणी मालक शिवाजी बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवार,17 एप्रिल रोजी रात्री अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला असून पीएसआय रंजना बागलाने तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »