dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

एका मताची कमाल… करुणा कल्ले यांचा एका मताने विजय; माजी आमदार पुत्राचा पराभव

वाशिम : नगरपरिषद निवडणूक मतमोजणीच्या निकालात चक्क एका मताने निकाल फिरल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वाशिम नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ (अ) मध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या उमेदवार करुणा राजू कल्ले यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवला आहे.

या प्रभागात माजी आमदार लखन मलिक यांचे पुत्र नितेश मलिक यांचा एका मताने पराभव झाला. मतमोजणीदरम्यान सुरुवातीला समर्थकांकडून नितेश मलिक हे एका मताने विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अंतिम फेरीतील अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करुणा कल्ले यांचाच एका मताने विजय असल्याचे स्पष्ट केले.

या अनपेक्षित ट्विस्टमुळे मतमोजणी केंद्र परिसरात ‘कही खुशी कही गम’ अशीच अवस्था पाहायला मिळाली. या निकालाने “एका मतालाही किती महत्त्व आहे” हे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले असून, वाशिमच्या राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top