शेगाव : शेगाव येथून आषाढी एकादशी उत्सवासाठी पंढरपूरला गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळा आटोपून ३१ जुलै रोजी संत नगरी शेगावमध्ये पोहोचली. पालखीच्या आगमनाने संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ‘गण गण गणात बोते’ च्या जयघोषाने संत नगरी दुमदुमून गेली होती.

ज्ञानेश्वर ताकोते /शेगाव : शेगाव येथून आषाढी एकादशी उत्सवासाठी पंढरपूरला गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळा आटोपून ३१ जुलै रोजी संत नगरी शेगावमध्ये पोहोचली. पालखीच्या आगमनाने संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ‘गण गण गणात बोते’ च्या जयघोषाने संत नगरी दुमदुमून गेली होती.
खामगाव येथे ३० जुलै रोजी मुक्काम झाल्यानंतर, ३१ जुलै रोजी पहाटे ५ वाजता श्री. अ. खि. मंगल कार्यालयातून पालखीने शेगावकडे प्रस्थान केले होते. खामगाव ते शेगाव दरम्यान पायी वारी करत असताना हजारो भाविकांचा ओघ पालखी सोबत पाहायला मिळाला. सकाळी १० वाजता श्री गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयात पालखी दाखल झाली. तेथे संस्थेच्या वतीने अतिशय उत्साही वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. अभिषेक, आरती, फुलांची उधळण आणि भक्तिभावपूर्ण कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला. श्रींची पालखी पुन्हा शेगावमध्ये पोहोचल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. पालखीचे जल्लोषात स्वागत करून शेगावकरांनी आपली भक्तीभाव सादर केला.
