महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला; नगरविकास विभागाचे पत्र जाहीर

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यानंतर आता महापालिकेमधील महापौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत नगर विकास विभागाने पत्र जाहीर केले आहे. त्यानुसार, सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे.

कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल. राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, 22 जानेवारी रोजी, परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 11 वा. पासून आयोजित करण्यात आली आहे. सदर बाब राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती, असे नगर विकास विभागाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी, यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते. सध्या कायद्यात एससी, एसटी, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे. मात्र, नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्याने सुरु केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »