समृध्दी महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’; लाखोंचे नुकसान

डोणगाव :  साताऱ्यावरून रांचीला ऑयल पेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने चॅनल नंबर 301 वर अचानक पेट घेतला.यामध्ये लाखोंचे नुकसान झाले.

डोणगाव :  साताऱ्यावरून रांचीला ऑयल पेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने चॅनल नंबर 301 वर अचानक पेट घेतला.यामध्ये लाखोंचे नुकसान झाले.

   समृद्धी महामार्गावर कधी काय होईल सांगता येत नाही, याची प्रचिती नेहमीच येते. सोमवार 12 मे च्या सकाळी समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने ऑयल पेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. या आगीत ट्रकमधील 80 लाख रूपये किंमतीचा पेंट व  ट्रक स्वा:हा झाला.

     समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर 301 वरती 12 मे च्या सकाळी 5 वाजून 40 मिनिटा दरम्यान सातारा वरून रांची एशियन पेंट घेऊन जाणारा ट्रक एम एच 16 सी डी 5971 हा नागपूर कडे जात असतांना ट्रॅकच्या आत वायरिंग जळत असल्याचा वास ट्रक चालक अशोक लक्ष्मण आवारे वय 45 वर्षे रा कोल्हेवाडी जिल्हा अहिल्यानगर यांना येताच त्यांनी इमर्जन्सी लेनवर ट्रक लावला व ट्रक मधून उडी मारली तेव्हढ्यात आतील पेंटने मोठा पेट घेतला आगीचा लोळ पसरला ज्यात चालकाचे थोडे केस जळाले मात्र तो सुखरूप बाहेर पडला जर दोन तीन सेकंद उशीर झाला असता तर ट्रक चालक जिवंत जळाला असता या ट्रक मधे अंदाजे 80 लाख रुपये किमतीचा ऑयल पेंट व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक जळून खाक झाले.आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग उपनिरीक्षक गजानन कर, पो हे कॉ गणेश सुसर, गोपाल गोरले यांनी घटना स्थळी पोचून अग्नी शमन विभागाला पांचरण केले असता दे राजा, लोणार, मेहकर यांनी आग विझवली व सोबतच क्विक रिस्पॉन्स टीम ने सुद्धा मदत केली. यावेळी मेहकर व बीबी पोलीस स्टेशनंचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »