‘त्या’ बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यात केले निसर्गमुक्त

बुलढाणा:  अंभोडा शिवारातील  शेतीच्या कुंपणात अडकलेल्या मादी बिबट्याची 21 एप्रिलच्या सकाळी वनविभागाने सुटका केली होती. अखेर, या बिबट मादीला अंबाबरवा अभयारण्यात निसर्गमूक्त करण्यात आले आहे.

बुलढाणा:  अंभोडा शिवारातील  शेतीच्या कुंपणात अडकलेल्या मादी बिबट्याची 21 एप्रिलच्या सकाळी वनविभागाने सुटका केली होती. अखेर, या बिबट मादीला अंबाबरवा अभयारण्यात निसर्गमूक्त करण्यात आले आहे.

      बुलढाणा वन परीक्षेत्रातील अंभोडा शिवारात कांताबाई शेषराव पवार यांनी गट क्रमांक 28 मध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे.वन्यप्राणी व इतर प्राण्यापासून भाजीपाला सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी शेताला दोरीच्या जाळीचे कुंपण लावलेले आहे. या कुंपणात एक मादी बिबट अडकल्याची घटना  सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, पशुधन विकास अधिकारी यांच्या निर्देशानुसार बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले होते. यानंतर, जेरबंद करण्यात आयलेल्या बिबट्याला वरिष्टांच्या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी अंबाबरवा अभयारण्यातील आडनाला येथे निसर्ग मुक्त करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक सरोज गवस, एसीएफ अश्विनी आपेट, आरएफओ अभिजीत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मोहसिन खान, संदीप मडावी, अमोल चव्हाण,पवन वाघ पवन मुळे,संघपाल तायडे, समाधान शिंदे यांनी ही कार्यवाही पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »