बुलढाणा : पहलगाम मधील हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यावर विरोधक राजकारण करत आहेत. परंतु हा हल्ला संपूर्ण देशावर असून भारताच्या आत्म्यावर आहे. याची सजा दहशतवाद्यांना नक्कीच मिळेल मिळेल.

बुलढाणा : पहलगाम मधील हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यावर विरोधक राजकारण करत आहेत. परंतु हा हल्ला संपूर्ण देशावर असून भारताच्या आत्म्यावर आहे. याची सजा दहशतवाद्यांना नक्कीच मिळेल मिळेल. पाकिस्तानला संपवायची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना करारा जवाब मिलेगा असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
बुलढाण्यात रविवारी आयोजित आभार मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील संजय राठोड संजय गायकवाड यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. दहशतवादी हल्ल्यावर बोलत असताना दहशतवाद नष्ट करायला आता सुरुवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अब कोई हद्द नही कोई सरहद नही… आता केवळ बदला. खून का बदला खून त्या परखड वक्तव्यांनी दहशतवाद्यांना संपवण्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना राज्य देश सोडण्याचे ठणकावून सांगितले. पोलिस शोधतील जागेवर ठोकतील. देशाच्या या लढाईत आमचा शिवसेना मागे राहणार नाही. शिवसैनिक जवानासारखा लढवेल असे एकनाथ शिंदे म्हणाले.