टेंभुर्णीच्या विद्यार्थीनीचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते सत्कार 

टेंभुर्णी :  येथील संचिता संजय सावंत या विद्यार्थीनीने काढलेल्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्ल छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांची उपस्थिती होती.

छत्रपती संभाजीनगर येथे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा, कविता स्पर्धा, निबंध स्पर्धा, नुक्कड अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नायलॉन मांजा आणि प्लास्टीकमुळे होणारे दुष्पपरिणाम व त्यांचा दुरउपयोग, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना, पोलिस एक आशादायी चेहरा असे विविध विषय देण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत टेंभुर्णी येथील संचिता सावंत या विद्यार्थीनीने काढलेले चित्र पाचशे स्पर्धकांमधून प्रथम आले. यानिमित्ताने तिचा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरिता उंबरकर, चित्रकला शिक्षक संजय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »