Teacher Vedha Samelan: शिक्षक वेध संमेलन उद्या खामगावात

शिक्षक वेध संमेलन उद्या खामगावात

Teacher Vedha Samelan: वेध परिवाराचे वेध संयोजक आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य प्रशिक्षक  निलेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदिती अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित बुलढाणा यांच्या वतीने गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे सोमवार २४ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील होतकरू आणि ॲक्टिव्ह शिक्षकांचे एक दिवसीय वेध संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Teacher Vedha Samelan:
Teacher Vedha Samelan:

खामगाव : केवळ शिकवणेच गरजेचे नसून प्रत्येक मुलांने “शिकायचे कसे” हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये एकीविसाव्या शतकातील कौशल्य विकसित व्हावेत. यादृष्टीने शिक्षकांमध्ये कोणते नवीन बदल घडणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सोमवार २४ जून रोजी खामगाव येथील गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय शिक्षक वेध संमेलनाचे (Teacher Vedha Samelan) आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील होतकरू आणि शिक्षकांसाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम वेध परिवाराचे वेध संयोजक आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य प्रशिक्षक  निलेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदिती अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित बुलढाणा यांच्या तर्फे राबविण्यात येत आहे.

या संमेलनामध्ये सहभागी होण्याकरता वेध परिवाराने एक गुगल फॉर्म क्रिएट करून जिल्ह्यातील सर्व प्रशासनाच्या शाळेतील शिक्षकांना प्रेरित करण्यात आले होते. याद्वारे जिल्ह्यातील १४० शिक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या कार्यक्रमात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री भटकर तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक  मनोज मेरत यांच्यासह गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणप्रेमी उपस्थित राहणार आहेत. शिक्षकांनी शिक्षकांसाठी आयोजित  कार्यक्रमात काही निवडक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या यशोगाथा सादर केल्या जाणार आहेत. तसेच पुढील शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षकांनी स्वतःमध्ये कशा प्रकारचे बदल घडवून आणून आपले काम कमी कसे होईल आणि जास्तीत जास्त मुले कशाप्रकारे शिकतील.

NEP 2020 ची अंमलबजावणी कशाप्रकारे करता येईल आणि आपल्या जिल्ह्यातील FLN लवकर कसे पूर्ण करता येईल याबाबत निलेश घुगे, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी, अशा व्यक्तींचे विचार ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सर्व शिक्षकांना आपल्या कामाची दिशा सुद्धा समजणार आहे. हे संमेलन एका दिवशी असून सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत हे संमेलन चालणार आहे. यामध्ये सहभागी शिक्षकांचे चहापाणी तसेच जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अदिती अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुरेश देवकर, त्याचबरोबर वेध परिवाराचे सदस्य  जितेंद्र राठी,  नितीन टाक , संदीप राऊत,  कैलास सुलताने ,  अरविंद शिंगाडे , सूपडा माठे ही सर्व मंडळी मेहनत घेऊन कार्यक्रमाची तयारी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »