खामगाव : ख्रिस्ती धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी. तसेच ख्रिस्ती धर्मगुरू व समाजाला संरक्षण द्यावे. अशा आशयाचे निवेदन ख्रिस्ती समाजाच्या वतीने 7 जुलै रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे पार पडलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चा मध्ये ख्रिस्ती धर्मगुरुबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या असून याबाबत जाहीर निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणी आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची तात्काळ आमदारकी रद्द करावी तसेच ख्रिस्ती धर्मगुरु व समाजाला सरंक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर रेव्ह अनिल थोरात, शमुवेल जी. लव्हाळे, राजु पॉल सह ख्रिश्चन समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर निवेदन देतांना महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.