भोकरदन : येथील नगरपरिषद सभागृहात पीठासीन अधिकारी मिर्झा समरीन नाज वसीम बेग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उपनगराध्यक्ष निवडीच्या बैठक पार पडली. यावेळी नगरसेविका सुरेखा जाधव यांची उपनगराध्यक्ष पदी यांची तर स्वीकृत सदस्य पदासाठी प्रा.नईम कादरी यांची निवड करण्यात आली आहे.

भोकरदन नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने घडविले हिंदू मुस्लिम ऐक्य साधल्याची चर्चा या निवड प्रक्रियेनंतर व्यक्त होत होती. नगराध्यक्ष मुस्लिम तर उपनगराध्यक्ष हिंदू धर्माचा देऊन हिंदू मुस्लिम धर्मामध्ये ऐक्य निर्माण करण्याची भावना व संदेश या निवडीतून जाईल असे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे माजी आमदार दानवे नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका सुरेखा बाळू जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तर स्वीकृत सदस्य पदासाठी प्रा. नईम कादरी यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते. मंगळवार, 13 जानेवारी रोजी नगराध्यक्षा समरीन नाज मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी युवानेते सुधाक दानवे, युवक तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.अंकुश जाधव, प्रा.नईम कादरी, शमीम मिर्झा, नगराध्यक्षा, गटनेते शफिक पठाण, नगरसेवक अजहर शहा, अब्दुल कदीर, अस्मत बेगम पठाण, आमेर शफिक पठाण, चंद्रकांत पगारे, कुरेशाबी बेग, शिला भारती, नसीम पठाण, लक्ष्मण ठोंबरे, बाळू जाधव, राजेंद्र जाधव, महेश औटी, अभिमन्यु जाधव, गंगाधर कांबळे, इसरारखॉ पठाण, धनराज भारती, वसीम मिर्झा, एजाज शेठ शहा, शफिभाई महामंत्री, फैसल चाऊस, गजानन घोडे, अंगद सहाने यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.