उन्हाचा चटका :  विद्यार्थ्यांचे आरोग्य जपत बुलढाणा जिपच्या शाळा आता सकाळी

बुलढाणा : विदर्भात उन्हाचा पारा मार्चच्या मध्याआधीच चढू लागला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी पहिलीपासून तर हायस्कूलपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा १२ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सकाळी ७ ते ११.३० या वेळेत सकाळच्या शाळा भरणार आहेत.

बुलढाणा : विदर्भात उन्हाचा पारा मार्चच्या मध्याआधीच चढू लागला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी पहिलीपासून तर हायस्कूलपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा १२ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सकाळी ७ ते ११.३० या वेळेत सकाळच्या शाळा भरणार आहेत. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांसह प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.

पाच दिवसांपूर्वी उष्णतेची लाट हवामान खात्याने वर्तविली होती. दोन दिवसांच्या अंदाजानुसार कडाक्याचे चटके लागत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही उन्हाचा पारा चांगलाच चढू लागला आहे. काही दिवसांपासून विदर्भ तापू लागला आहे. पाणीटंचाईचेदेखील चटके बसू लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघातासह विविध आजार टाळण्यासाठी जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व शाळा १२ मार्च २०२६ पासून सकाळी ७ ते ११.३० या वेळेत भरविल्या जाणार आहेत. शैक्षणिक सत्र संपेपर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहे.

पूर्णवेळ शाळेप्रमाणे सर्व तासिका होतील व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील अध्यापनाच्या तासाच्या तरतुदीचा भंग होणार नाही तसेच निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाच्या अंमजबजावणीमध्ये अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश सीईओ गुलाबराव खरात यांनी दिले आहेत.

सकाळच्या सत्रात शैक्षणिक बाबतीत कोणत्याही प्रकारची दिरंगाई झाल्यास, संबंधित मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सकाळच्या शाळा सुरू ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी सर्व शाळांना अवगत करावे, असे सूचित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »