Subhash Patil home after seventeen years : शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांनी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात बुधवार दि.३० ऑक्टोंबर रोजी प्रवेश केला. तब्बल सतरा वर्ष ते शिवसेनेपासून दूर होते. आज अखेर त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांनी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात बुधवार दि.३० ऑक्टोंबर रोजी प्रवेश केला. तब्बल सतरा वर्ष ते शिवसेनेपासून दूर होते. आज अखेर त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले. यावेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनीही शिंदे गटाला राम राम करत शिवसेनेत प्रवेश करुन घेतला. ठोंबरे यांच्या व्यतिरिक्त राजेंद्र काळे,पंडित पवार ,नाना किसन मेटे, रमेश पंडित पवार, दुराज राजेंद्र काळे, श्रीकांत जगदाळे व आयुब पटेल यांनीही जाहिररित्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.
मराठवाड्यात शिवसेनेची दौड घोड सुरू होताच सुभाष पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पाहिले प्रमुख म्हणून शिवसेनेचे काम सुरू केले होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात शिवसेनेने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता मिळवली होती. महानगरपालिकेत काही नगरसेवक निवडून आणण्याचे यश त्यांच्या नावे आहे. आमदार आणि मात्र जिल्ह्याचा खासदारही ते शिवसेनेत सक्रिय असताना झाले. शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पाडल्यानंतर पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला. आता ते पुन्हा शिवसेनेत दाखल झाले असून त्यांच्यामुळे जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांना बळ मिळाले आहे.