Stone pelting in Mehkar: मेहकर शहरात वाहनांची जाळपोळ, संचारबंदी जरी

Stone pelting in Mehkar

Stone pelting in Mehkar:  मेहकर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री शहरातील माळीपेठ भागात दोन गटात धुमश्चक्री झाली. दगडफेक व अनेक वाहनांची जाळपोळ झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मेहकर शहरात रविवारच्या रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे.

Stone pelting in Mehkar

बुलढाणा : मेहकर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री शहरातील माळीपेठ भागात दोन गटात धुमश्चक्री झाली. दगडफेक व अनेक वाहनांची जाळपोळ झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मेहकर शहरात रविवारच्या रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील २१ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकारामागे राजकीय असंतोषाचे कारण असल्याचे समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित आमदाराचा एका नवख्या उमेदवाराकडून पराभव झाल्यानंतर एका गटात प्रचंड अस्वस्थता असून असंतोष धुमसत आहे. त्याचीच ठिणगी पडून शहरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, २४ नोव्हेंबरच्या रात्री दोन गटात दंगल झाली. यावेळी काही वाहने पेटवण्यात आली, तसेच दगडफेकही करण्यात आली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या आदेशानुसार संचारबंदीचे आदेश लागू झाले आहेत. मेहकर शहरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरच्या नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळवलेले आणि राजकारणात अगदीच नवखे असलेल्या सिध्दार्थ खरात यांनी शिवसेना शिंदे गटाचे सलग तीन टर्म आमदार राहिलेले डॉ. संजय रायमूलकर यांचा ५२१९ मतांनी पराभव केला. हा अनपेक्षित व धक्कादायक पराभव रायमूलकर समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे निवडणुकीच्या निकालापासूनच मेहकर शहरात वातावरण तापलेले आहे. आता संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »