परभणी : राजवीरा राजपाल जामकर आयोजित नवरात्र महोत्सवाअंतर्गत रविवार, 5 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या नवरात्री विथ जामकर्स कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मराठी सिनेअभिनेत्री शिवानी सुर्वेची उपस्थिती होती.

नवरात्रमहोत्सवा अंतर्गत नवरात्री विथ जामकर्स कार्यक्रम रायना कन्सलटंसी अॅन्ड मॅनेजमेंन्ट आणि नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. दांडिया विथ जामकर कार्यक्रमास दिपा जामकर, संध्या जामकर, सोनिया जामकर, जया देवकर, राजश्री पंडित, डॉ. संप्रिया पाटील, वसुंधरा जामकर, नेहा जामकर, कार्यक्रमाच्या मुख्यसंयोजिका राजवीरा जामकर, डॉ. विजया धुतमल, डॉ. मिना टाकळकर, गिता नांदापुरकर, ज्योती देशमुख, नेहा सुभेदार, गौरी सुभेदार, डॉ. अवचार, मुख्याध्यापिका हत्तीअंबिरे, नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित सर्व विभागातील महिला शिक्षिका, प्राध्यापिका आदींचा सहभाग होता. नवरात्रोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना अभिनेत्री शिवाजी सुर्वे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.