dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिंदेसेनेकडून खासदार देशमुखांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक;  संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक बॅनरलाही जोडेमारो आंदोलन

वाशिम : खासदार संजय देशमुख यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेचे समर्थन करत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवारी शहरातील पाटणी चौक परिसरात त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार संजय देशमुख यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

उद्धव ठाकरे गटातील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून विविध ठिकाणी खासदारांच्या समर्थनार्थ आंदोलने व स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. वाशिम येथेही जिल्हाप्रमुख विजय खानझोडे, महादेव ठाकरे व युवासेना प्रमुख रवी भांदुर्गे यांच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले.  यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, शिवसेना नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक बॅनरला जोडेमारो आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top